Homeक्राईमआंबी येथे मेफेड्रोन विक्रीसाठी आलेला तरुण अटकेत

आंबी येथे मेफेड्रोन विक्रीसाठी आलेला तरुण अटकेत

आंबी येथे मेफेड्रोन विक्रीसाठी आलेला तरुण अटकेत

गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई; १६.३९ ग्रॅम अमली पदार्थ जप्त

आंबी (ता. मावळ) – मेफेड्रोन हा घातक व निषिद्ध अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने आंबी येथे अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १६.३९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करून आरोपीसह कार ताब्यात घेतली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे १ लाख ६३ हजार ९०० रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.

Oplus_16908288

ही कारवाई गुरुवार, दिनांक १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीचे नाव संतोष अशोक कोरडे (वय ३५, रा. ताजे, ता. मावळ) असे आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर जैनक यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुन्हे शाखा युनिट तीनला गुप्त माहिती मिळाली होती की, आंबी परिसरात एक व्यक्ती मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून पाहणी सुरू केली. काही वेळातच संशयित आरोपी संतोष कोरडे हा कारने तेथे आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता १६.३९ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन आढळले.

सदर अमली पदार्थासह आरोपीकडून कार, मोबाइल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले असून, पुढील तपास सुरू आहे.

मेफेड्रोन (Mephedrone) हा सिंथेटिक ड्रग प्रकारातील अत्यंत धोकादायक अमली पदार्थ असून, तो तरुणाईत “एमडी”, “मीओ मीओ” या नावाने ओळखला जातो. या पदार्थाचे सेवन आरोग्यास घातक ठरते आणि व्यसनाधीनतेकडे नेणारे असते. महाराष्ट्रात अलीकडेच पोलिसांनी अशा अनेक प्रकरणांत कारवाया केल्या असून, पोलिस विभागाने या अमली पदार्थाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करीत असून, आरोपीकडून पुरवठादार व विक्री साखळीबाबत माहिती घेतली जात आहे. मेफेड्रोन विक्रीच्या मोठ्या जाळ्याचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे | मोबाईल : ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!