आदिवासी आश्रम शाळेला शालेय साहित्य वाटप
टाकवे : शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर यांच्या विशेष प्रयत्नातून इंरव्हील क्लब तळेगाव च्या वतीने सोमवार दिनांक १४ जुलै २०२५रोजी श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय वाहणगाव व शासकीय आदिवासी आश्रम शाळा वडेश्वर सदिच्छा भेट दिली. या भेटीनिमित्ताने सुमारे वाहणगाव येतील 8वी ते 10 वी तील 140 विध्यार्थी व वडेश्वर आश्रम शाळा येतील 10वी 12वी च्या 94 विध्यार्थीना च्या शालेय साहित्य (फुलस्केप वहि कंपास पेन पट्टी सिन्स्पेनील इत्यादी चे वाटप इंरव्हील क्लब तळेगाव पदाधिकारी श्री. अनंत ओब्राईन यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यां समाजोपयोगी उपक्रम राबविला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर अमिता ओब्राईन एडिटर, इंरव्हील क्लब रश्मी थोरात अध्यक्ष इंरव्हील क्लब स्वाती दाभाडे सदस्य श्रीमती. देसाई मॅडम, राजूभाऊ खांडभोर शिवसेना तालुका प्रमुख, काळुराम वाडेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, संतोष गाभले शाळा समिती अध्यक्षशासकीय आदिवासी आश्रम शाळा
कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानले भैरवनाथ विद्यालय च्या विनय नंदकुमार कसबे (मुख्याध्यापक )यांनी शाळेच्या वतीने स्वागत केले व आभार मानले तर शासकीय आदिवासी शाळा च्या वतीने गोगावले सर अधीक्षक यांनी आभार व स्वागत केले यावेळी विध्यार्थी व शिक्षक उपस्थित होते
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















