Homeसामाजिकआमदार सुनील शेळके यांच्या स्थानिक विकास निधीतून झाला प्रकल्प

आमदार सुनील शेळके यांच्या स्थानिक विकास निधीतून झाला प्रकल्प

परंदवडी येथे दलितवस्तीमध्ये समाजमंदिराचे बांधकाम पूर्ण

आमदार सुनील शेळके यांच्या स्थानिक विकास निधीतून झाला प्रकल्प

परंदवडी (प्रतिनिधी) २५ एप्रिल  मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या प्रयत्नातून परंदवडी येथील दलितवस्तीमध्ये ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत बांधण्यात आलेल्या समाजमंदिराचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या उपयुक्त सामाजिक प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांना सामूहिक उपक्रमांसाठी व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी एक छताखाली जागा उपलब्ध झाली आहे.

या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या आमदार स्थानिक विकास निधी २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत लेखाशिर्ष ४५१५ अंतर्गत सुमारे २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. ठेकेदार ओंकार अनिल टेकवडे यांच्या मार्फत हे काम सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर), पुणे येथील कार्यकारी अभियंता यांच्या देखरेखीखाली संपूर्ण काम मार्गी लावण्यात आले.

समाजमंदिराचे हे बांधकाम स्थानिक दलित वस्तीतील नागरिकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे केंद्रबिंदू ठरणार आहे. पूर्वी अशा सोयींचा अभाव असल्यामुळे लग्नसमारंभ, श्राद्ध विधी, बैठका यांसाठी नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता या नव्या सुविधेमुळे गावकऱ्यांना हक्काची व समर्पक जागा मिळाली आहे.

या कामाबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार सुनील शेळके यांचे विशेष आभार मानले असून, त्यांनी वेळोवेळी दिलेला पाठपुरावा आणि निधी मिळवून दिल्यामुळेच समाजमंदिराचे स्वप्न साकार झाले, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!