Homeमहत्त्वाचेकत्तली पासुन सुटका केलेल्या ७८गाईचा ताबा गोशाळेकडेच. न्यायदंडाधिकारी यांचा निर्णय

कत्तली पासुन सुटका केलेल्या ७८गाईचा ताबा गोशाळेकडेच. न्यायदंडाधिकारी यांचा निर्णय

कत्तली पासुन सुटका केलेल्या ७८गाईचा ताबा गोशाळेकडेच. न्यायदंडाधिकारी यांचा निर्णय

वडगाव : वडगाव फाटा येथे मागील दोन महिन्यापूर्वी ७८ गोवंशाची कत्तली साठी वाहतूक करत असताना गोरक्षकांना आढळून आल्याने त्या संदर्भात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जनावरांची अवैधरित्या वाहतूक करताना सुटका केलेल्या ७८ गाईचा ताबा मिळवण्यासाठी संबंधित खरेदीदारांनी वडगाव मावळ न्यायालयात दाखल केलेला अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांनी फेटाळला असून गाईचा ताबा महावीर गोपाळकृष्ण गोशाळा ट्रस्ट कडे कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

गुन्ह्यातील जप्त गोवंशाचे मालक आपणच असल्याचे सांगत गोवंशाचा अंतिम ताबा मिळावा यासाठी खरेदीदारांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन वडगाव मावळ न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या निकालपत्रात श्री महावीर गोपाळ कृष्ण गोशाळा ट्रस्टला गाईसाठी दररोज २०० रुपये देखभाल खर्च मिळवण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले आहे.

तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्यात जप्त प्राण्यांची काळजी व भरण पोषण बाबतच्या निर्णयाची पूर्तता करावी व देखभाल खर्चाची रक्कम भरण्यासाठी अर्जदार मालकांनी तीन दिवसाच्या आत हमीपत्र द्यावे असा आदेश दिला आहे. न्यायालयीन कामकाज अॅड राजू गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड पवन सुरेश भंडारी यांनी पाहिले तर महावीर गोपाळकृष्ण गोशाळा ट्रस्टच्या वतीने दर्शन वहिले, आकाश वारुळे न्यायालयात उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!