लोणावळा : खंडाळा येथे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून एक दिशादर्शक फलक वाऱ्याच्या झोक्यामुळे जुना पुणे मुंबई महामार्गावर पडला. सुदैवाने तेथून कोणी जात नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली लोणावळा खंडाळा येथे ६जुन २०२५ रोजी सकाळी १०:४० वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरून एक दिशादर्शक फलक वाऱ्याच्या झोक्यामुळे जुना पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पडला.
त्यावेळी सुदैवाने राष्ट्रीय महामार्गावरून कोणत्याही वाहन अथवा व्यक्ती जात नव्हती ६ जून रोजी खंडाळा भागातील एक चार चाकी वाहन चालक लोणावळ्याच्या दिशेने येत असताना पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेच्या पुलावरून एक दिशादर्शक फलक वाऱ्याच्या झोक्यामुळे वेगात खाली येऊन जुना पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पडला.
सुदैवाने यावेळी पुलाच्या खालून कोणतीही वाहन अथवा व्यक्ती त्या ठिकाणाहून जात नव्हती. जर या ठिकाणावरून वाहन अथवा व्यक्ती जात असती तर मोठी हानी झाली असती. वाऱ्याच्या झोक्यामुळे पडलेला हा दिशादर्शक फलक एका संस्थेचा असून सुरक्षेबाबत माहिती देणारा हा फलक होता अशी माहिती मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















