गॅस सिलेंडर च्या टाक्या चोरणाऱ्या तरूणाला लोनावळा पोलिसांनी केली अटक
लोनावळा : शहरातील प्रियदर्शनी संकुल, गाळा क्र. ८, गावठाण लोणावळा समोर उभ्या असलेल्या पॅगो टेम्पो (MH 14 JP 7606) मधून ६ भारत गॅसचे घरगुती सिलेंडर (प्रत्येकी 14.2 किलो) चोरीला गेल्याची घटना शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट२०२५ रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा या सुमारास घडली.
फिर्यादी विरेंद्र विठ्ठल पवार (वय ३५, रा. जुना खंडाळा, नागपाल सोसायटी, खंडाळा) यांच्या टेम्पोमधून एक सिलेंडर तसेच लोणावळा परिसरातील इतर ठिकाणांहून पाच सिलेंडर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. चोरटे पुढील व मागील क्रमांक प्लेट नसलेल्या मोटारसायकलवरून घटनास्थळी आले होते. चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे १८ हजार रुपये आहे.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गु.र. नं. ३०७/२०२५, भा.दं.सं. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रईस मुलानी यांनी सतर्कतेने पाठलाग करून आरोपीला पकडले आहे. आरोपीकडून चौकशी सुरू असून, या प्रकरणात अजून कोणी सामील आहे का याचा तपासही सुरू आहे.
गुन्हेगारांविरुद्ध चोरीविरोधी मोहीम राबविल्याबद्दल लोणावळा नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे. चिंतामणी अरुण पोळेकर (वय २५.गुरव वस्ती, कुसगाव बुद्रुक, लोणावळा) असे या गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरणाऱ्या तरुणाचे नाव आहे.पुढिल तपास सहायक फौजदार शेख हे करत आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















