
गोल्डन रोटरी तर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.ध्वजारोहण रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष रो. संतोष परदेशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी गोल्डन आरसीसी अध्यक्ष सौ. अनिता भेगडे, माजी तहसीलदार श्री रामभाऊ माने, रो दीपक फल्ले, रो किरण ओसवाल, डॉ दिनेश महालिंगे, रोट्रॅक्ट अध्यक्ष ललित देसले, सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मणराव माने, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे चे डॉक्टर्स नर्स अशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ध्वजपूजन झाल्या नंतर ध्वजारोहण, राष्ट्रगीत व प्रजासत्ताक दिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
यानंतर युवा रत्न सन्मान पुरस्कार १४ वर्षाखालील महाराष्ट्र संघात समावेश झाल्याबद्दल तळेगावचे सुपुत्र डॉक्टर प्रवीण माने यांचे चिरंजीव आदित्य प्रवीण माने यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीय माझी तहसीलदार श्री रामभाऊ माने व शिक्षण मंडळाचे माजी सदस्य श्री लक्ष्मणराव माने यांनी स्वीकारला.


तसेच प्राथमिक आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वर्षा बुटे, सविता हेगडे, स्वाती होनमरे या तीन आशा सेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय मुंबई मॅरेथॉन ४२ कि.मी.पूर्ण करणाऱ्या भावपटूंचा रोट्रॅक्ट तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रदीप टेकवडे यांनी केले, तर प्रास्ताविक श्री किरण ओसवाल यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. अनिता भेगडे यांनी केले.

या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे, रोट्रॅक्ट चे सर्व सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व सर्व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अशा प्रकारे ७७ वा प्रजासत्ताक दिन एकात्मता, देशभक्ती व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून यशस्वीरीत्या साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















