Homeटेक्नॉलॉजीडिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन १४ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर...

डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन १४ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे होणार

डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन १४ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे होणार

मुंबई : डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने डिजिटल मीडिया परिषद या नावाचा स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रम असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०: वाजता छत्रपती संभाजी नगर येथील एकनाथ रंगमंदिर चौक येथे मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती एस. एम. देशमुख यांनी दिली आहे.

राज्यातील ३० जिल्ह्यात आता डिजिटल मीडियाच्या शाखा सुरू झाल्या असून या माध्यमातून २००० पत्रकार परिषदेचे जोडले गेलेले आहेत. उर्वरित जिल्ह्यात शाखा स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिषदेची जोडल्या गेलेल्या पत्रकारांना एकत्र करून डिजिटल माध्यमांची तांत्रिक माहिती देणे तसेच परस्पर सुसंवाद येणाऱ्या अडचणी यांची चर्चा करणे.हा या अधिवेशनाचा प्रमुख उद्देश आहे.

अधिवेशनात डिजिटल मीडिया विश्वातील मान्यवरांची व्याख्याने होतील तसेच उत्कृष्ट युट्युब आणि पोर्टल चालवणाऱ्या दहा संपादकांचा अधिवेशनात सन्मान करण्यात येणार आहे. सबस्क्राईबर्स. व्हूयर्सची ची संख्या. तांत्रिक बाजू. बातम्यांची निवड आणि लोकांचे प्रश्न उत्तम पद्धतीने मांडणाऱ्या संपादकांची निवड करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. डिजिटल मीडिया परिषदेची अद्याप राज्य कार्यकारिणी झालेली नाही. या अधिवेशनात राज्य कार्यकारिणी निवडली जाणार आहे.

डिजिटल मिडियाला सरकारने जाहिराती देण्याचा निर्णय घेतला असला तरी या जीआर मध्ये युट्यूब चँनल्स तसेच न्यूज पोर्टलचा उल्लेख नाही… ही बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देत त्यांना जाहिराती मिळाव्यात असा प्रयत्न केला जाणार असल्याचे तसेच डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी यासाठी देखील सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असून अधिवेशनात तसे ठराव मांडले जाणार आहेत. प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे अनेक प्रश्न अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने मार्गी लावले आहेत. त्याच प्रमाणे डिजिटल मिडियाला भेडसावणारे प्रश्न हाती घेऊन डिजिटल मिडिया परिषद त्यांचा पाठपुरावा करणार आहे

अधिवेशनात त्यासंबंधी देखील चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे.

डिजिटल मिडियाच्या या पहिल्या अधिवेशनास डिजिटल माध्यमातील पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, विभागीय सचिव रवी उबाळे, कार्यक्रमाचे निमंत्रक आणि संभाजीनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी केले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!