Homeशहरतळेगावात लाडक्या बाप्पाचे ढोल-ताशाच्या गजरात मंगलमय आगमन

तळेगावात लाडक्या बाप्पाचे ढोल-ताशाच्या गजरात मंगलमय आगमन

तळेगावात लाडक्या बाप्पाचे ढोल-ताशाच्या गजरात मंगलमय आगमन

तळेगाव दाभाडे : भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या पावनदिनी आज तळेगाव शहरात लाडक्या बाप्पाचे मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात आगमन झाले. शहरातील घराघरांत तसेच विविध सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मंगलमय वातावरणात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळपासूनच बाजारपेठेत गणेशमूर्तींसोबत पूजेचे साहित्य व सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.

शहरातील प्रमुख गणेश मंडळांमध्ये प्रथम मानाचा गणपती श्री डोळसनाथ महाराज तालीम सार्वजनिक गणेश मंडळ, भेगडे तालीम सार्वजनिक गणेश मंडळ, श्री गणेश तरुण मंडळ, राजेंद्र चौक गणेश मंडळ आदी मंडळांचा समावेश असून, या मंडळांच्या मिरवणुका संध्याकाळी ढोल-ताशा, टाळ-मृदंग, लेझीम यांच्या गजरात मोठ्या जल्लोषात निघाल्या.

गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच भाविक उत्साहाने सहभागी झाले. लहान मुलांनी आपल्या बालमंडळांत रंगीत डेकोरेशन व फुलांच्या सजावटीत सहभाग घेतला. घराघरांत पारंपरिक वेशभूषेतून बाप्पाला घरी आणताना भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

सोशल मीडियावरही बाप्पाच्या आगमनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असून, वातावरणात भक्तिभाव आणि उत्साहाची लहर पसरली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये तसेच आगमन मार्गांवर वाहतूक नियंत्रण ठेवून पोलिसांनी नागरिकांना सुविधा मिळावी याची काळजी घेतली.

यावेळी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. तसेच भेगडे तालीम मंडळाचे आधारस्तंभ, माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे म्हणाले, “आज आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पा हा बुद्धी, समृद्धी आणि विकासाचा देव आहे. त्याच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाच्या, शहराच्या आणि समाजाच्या विकासासाठी कार्यरत राहूया.”

गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण तळेगाव शहरात भक्तिमय आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!