तळेगावात वारंवार वीजपुरवठा खंडित
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे स्टेशन व गाव भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी आणि वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रगती रूकारी यांनी केली आहे.
त्यापुढे असे म्हणाल्या की गाव व स्टेशन भागामध्ये काही दिवसापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. दरम्यान विविध भागात झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. परंतु या कामाच्या नावाखाली कोणतेही नियोजन किंवा वेळापत्रक न ठरवता कोणत्याही वेळी विजापुरवठा तासंन् तास बंद केला जात आहे.
नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना दिली जात नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचे प्रमाण जास्त नसताना देखील विज खंडित होण्याचे हे प्रमाण का वाढत आहे? छोटे मोठे लघुउद्योग. ऑनलाइन काम करणारे या सगळ्यांनाच इन्व्हर्टर घेणे शक्य नसते. रात्रीच्या वेळी अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने चोरी व गैरप्रकार होण्याची शक्यता वाढली आहे.
प्रगती रूकारी शेवटी म्हणाल्या की महावितरण कार्यालयामध्ये दूरध्वनीवर संपर्क केला असता तेथील कर्मचारी व अभियंते प्रतिसाद देत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन गाव व स्टेशन भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















