Homeसामाजिकतळेगाव दाभाडे च्या मातीत रुजलेले एक बीज . दिलीप डोळस यांची सामाजिक...

तळेगाव दाभाडे च्या मातीत रुजलेले एक बीज . दिलीप डोळस यांची सामाजिक कृतज्ञतेची कहाणी

तळेगाव दाभाडे च्या मातीत रुजलेले एक बीज . दिलीप डोळस यांची सामाजिक कृतज्ञतेची कहाणी

तळेगाव दाभाडे : इतिहास, संस्कृती आणि माणुसकीची नाळ घट्ट विणलेलं हे तळेगाव दाभाडे इथल्या मातीचा सुगंध म्हणजे जगण्याची प्रेरणा. हाच सुगंध घेत वाढलेले दिलीप डोळस, गेली तीन दशके आपल्या साध्या, पण हृदयस्पर्शी रिक्षा प्रवासातून असंख्य चेहऱ्यांवर हसू उमटवत आहेत.

“हीच माझी दुनिया आहे,” असं हसत सांगणारे दिलीपभाऊ म्हणतात, “या शहराने मला जे दिलं, ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही.

तीस वर्षांपूर्वी, एका साध्या रिक्षेपासून सुरुवात झाली. हातावर पोट असलेलं आयुष्य, पण मनात स्वाभिमान आणि समाधान. रोज नवे प्रवासी, नवे अनुभव, नवी कहाणी. कधी एखादं हसू, कधी एक साधं “धन्यवाद” एवढंच पुरेसं असायचं दिवस उजळवायला.

“रिक्षा माझं साधन आहे, पण ती माझी ओळखही बनली. प्रत्येक प्रवासी म्हणजे माझ्या आयुष्याचा एक नवा पान,” असं दिलीप डोळस सांगतात.

या दीर्घ प्रवासात त्यांनी पैसा मिळवला, पण त्याहून मौल्यवान असं काही अधिक मिळवलं माणुसकी, सन्मान आणि विश्वास. “माझ्या प्रवाशांनी मला कधीच चालक म्हणून नाही, तर माणूस म्हणून सन्मान दिला. म्हणूनच हे बीज अंकुरलं, फुललं आणि आता वृक्ष झालं.

पण दिलीपभाऊंचं मन केवळ उपजीविकेपुरतं मर्यादित नाही. ते म्हणतात, “समाजानं दिलेलं हे ऋण परत करणं माझं कर्तव्य आहे.

आणि म्हणूनच दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, २७ ऑक्टोबरला, ते एक आगळं वेगळं काम करतात त्या दिवशी त्यांची रिक्षा संपूर्ण दिवस मोफत चालते.

हो, अगदी मोफत. कोणीही बसू शकतं, कुठेही जाऊ शकतं, काहीही पैसे न देता. फक्त एक हसू, एक आशीर्वाद आणि त्यांना तेवढंच गिफ्ट पुरेसं आहे.

“उद्या माझी रिक्षा दिसली, तर नक्की बसा,” ते प्रेमानं म्हणतात. “पैसे नकोत फक्त तुमचं हसू आणि शुभेच्छा हव्यात. कारण हे शहरच माझं कुटुंब आहे.

त्यांच्या या उपक्रमामागे प्रसिद्धीची आकांक्षा नाही, तर कृतज्ञतेचा शुद्ध भाव आहे. “तळेगावने मला जगण्याचं व्यासपीठ दिलं. म्हणूनच ही माझी ‘धन्यवादाची सवारी’ आहे,” असं ते हसत सांगतात.

रिक्षा चालवताना त्यांच्या हातात स्टेअरिंग असतं, पण मनात नेहमी तळेगावचा विचार. “या शहराने मला घडवलं, म्हणून आज मी समाजाला काही परत देऊ शकतोय हाच माझा अभिमान आहे. तळेगावच्या रस्त्यांवरून फिरताना त्यांची रिक्षा फक्त वाहन नाही, तर ती आहे मानवतेची गाडी जिथे भाडं नसतं, पण भावना असतात.

आज २७ ऑक्टोबरला, तळेगावच्या कोणत्याही रस्त्यावर तुम्हाला दिलीप डोळस यांची रिक्षा दिसली, तर थांबा… बसा… आणि त्यांच्या या नि:स्वार्थ प्रवासाचा भाग व्हा. कारण ही रिक्षा फक्त प्रवासासाठी नाही ती कृतज्ञतेच्या वाटेवरचा प्रवास आहे. “आज माझी ही रिक्षा दिसली, तर बसा आणि मला उपकृत करा.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!