Homeमहत्त्वाचेतळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे व शिवशंभु स्मारकाचे २० ऑक्टोबरला उद्घाटन

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे व शिवशंभु स्मारकाचे २० ऑक्टोबरला उद्घाटन

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे व शिवशंभु स्मारकाचे २० ऑक्टोबरला उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रम

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नव्या प्रशस्त इमारतीचे व शिवशंभु स्मारकाचे भव्य उद्घाटन येत्या २० ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. याबाबतची माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नगर परिषदेची जुनी इमारत जवळपास ५० वर्षांपूर्वी बांधलेली होती. कालांतराने ती जीर्णावस्थेत गेल्याने अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त नगरपरिषदेत येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रशासकीय कामकाजातही अडथळे निर्माण होत असल्याने नवी इमारत उभारण्याची मागणी सातत्याने होत होती.

या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना व नगरपरिषद निधीतून तब्बल ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. २०२२ साली अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले होते. दोन वर्षांच्या कालावधीत काम पूर्णत्वास गेले असून आता उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे.

नव्या पाच मजली इमारतीत आधुनिक सोयी-सुविधांचा समावेश असून ती नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, समिती सभापती, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी व अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र दालने मोठे व अत्याधुनिक सभागृह कलादालन व नागरिकांसाठी विशेष सुविधा विभाग प्रशस्त वाहनतळ सुसज्ज प्रशासकीय कार्यालयीन जागा

या इमारतीमुळे नगरपरिषदेचे कामकाज अधिक सुलभ व गतीमान होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले.

नगर परिषदेच्या इमारतीसोबतच शिवशंभु स्मारकाचे उद्घाटनदेखील याच दिवशी होणार आहे. तळेगाव दाभाडे शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक जतनासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

(प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे)९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!