तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मार्फत १९ जुलै रोजी विशेष बैठकीचे आयोजन
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व दहीहंडी उत्सव साजरा करणारी मंडळे व सार्वजनिक गणेश मंडळे तसेच शांतता कमिटी सदस्य. महिला दक्षता समिती सदस्य. सर्व पत्रकार बंधू भगिनी. ग्राम सुरक्षा दल सदस्य. व्यापारी उद्योजक समिती सदस्य यांची शनिवार दिनांक १९जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५: वाजता सुशीला मंगल कार्यालय लिंब फाटा तळेगाव दाभाडे येथे आगामी दहीहंडी व सार्वजनिक गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील बैठकीस माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ २ पिंपरी चिंचवड तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी वेळेवर या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी केले आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११
















