तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज मंदिरासमोर दीपमाळ भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न
वडगाव मावळ – तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज मंदिरासमोर भव्य दीपमाळ उभारणीसाठी भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.
पूर्वी वडगाव येथे वास्तव्यास असणारे आणि सध्या इंदुरी येथे राहणारे जेष्ठ व्यक्तिमत्व श्री संभाजी बाजीराव पानसरे यांच्या पुढाकाराने दोन दीपमाळ उभारण्यात येणार आहेत. या निमित्ताने झालेल्या भूमिपूजन व दीपमाळ पूजन कार्यक्रमाला देवस्थान संस्थानचे विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ तसेच महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात वेदमंत्रोच्चारांच्या गजरात पूजन विधी पार पडला. त्यानंतर भूमिपूजन करण्यात आले. यावेळी देवस्थान संस्थानच्यावतीने श्री. पानसरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, सचिव अनंता कुडे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, विश्वस्त भास्करराव म्हाळसकर, सुभाषराव जाधव, अशोक ढमाले, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, तुकाराम काटे, सुनिता कुडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपमाळ उभारणीमुळे मंदिर परिसरातील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक वृद्धिंगत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.




















