Homeमहत्त्वाचेत्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) व लोणावळा येथील घटनांवर मावळ तालुका मराठी पत्रकार संघटेनेचे...

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) व लोणावळा येथील घटनांवर मावळ तालुका मराठी पत्रकार संघटेनेचे तहसीलदाांना निवेदन 

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) व लोणावळा येथील घटनांवर मावळ तालुका मराठी पत्रकार संघटेनेचे तहसीलदाांना निवेदन 

वडगाव मावळ, दि. २३ (प्रतिनिधी) त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे., तसेच लोणावळा येथे स्थानिक पत्रकाराच्या बातमीसोबत झालेल्या छेडछाड प्रकरणामुळे पत्रकार संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून या दोन्ही घटनांचा तीव्र निषेध नोंदवत मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने मावळ तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष विशाल विकारी, सचिव रामदास वाडेकर, प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे, सल्लागार ज्ञानेश्वर वाघमारे, रमेश जाधव, उपाध्यक्ष भारत काळे, खजिनदार संकेत जगताप, कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर ठाकर, रेश्मा फडतरे, चेतन वाघमारे, रवी ठाकर, सतीश गाडे यांसह सुभाष भोते, प्रफुल्ल ओव्हाळ, विशाल कुंभार, अभिषेक बोडके, प्रशांत पुराणिक, ज्ञानेश्वर शिंदे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. व मावळ तालुका मराठी पत्रकार संघ, वडगाव शहर मराठी पत्रकार संघ, तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघ, लोणावळा शहर पत्रकार संघ, तळेगाव दाभाडे प्रेस फाऊंडेशन, देहूरोड शहर मराठी पत्रकार संघ, कामशेत शहर पत्रकार संघ, पवनमावळ मराठी पत्रकार संघ या संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

दिनांक २० सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजणे, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेले तिन्ही पत्रकार नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यासह मावळ तालुक्यातील लोणावळा येथील पत्रकार विशाल पाडाळे यांच्या बातमीसोबत छेडछाड करून ती प्रसिद्ध करून पत्रकार विशाल पाडाळे यांची बदनामी करण्याचे विकृत कृत्य अज्ञातांनी केले.

मावळ तालुका मराठी पत्रकार संघटनेने या घटना म्हणजे लोकशाहीवर प्रहार असल्याचे सांगत कठोर शब्दांत निषेध नोंदवला. “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजातील अन्याय व भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतो. अशा पत्रकारांवर होणारे हल्ले केवळ व्यक्तींवर नसून संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर आहेत. महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असला तरी त्याचा प्रभावी अंमल होत नाही, त्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच त्र्यंबकेश्वर आणि लोणावळा प्रकरणांत गुन्हेगारांना योग्य ते शासन व्हावे,” असे यावेळी नमूद करण्यात आले.

पत्रकार संघटनेने निवेदनात केलेल्या मागण्या :

– त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला प्रकरणी सदर आरोपींवर तत्काळ मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा,

– ए.एस. मल्टी सर्व्हिस कंपनीचा संबंधित ठेकेदार याच्या विरोधातही गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी,

– सदर कंपनीला काळ्या यादीत टाकावे,

– लोणावळा येथील पत्रकार विशाल पाडाळे यांच्या बातमीशी छेडछाड करून ती प्रसारित करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करावा

शासनाने या मागण्या विचारात घेऊन दोषींवर कारवाई करावी, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा मराठी पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पत्रकारांचे म्हणणे ऐकूण घेत, त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!