Homeक्राईमदारूच्या नशेत घरात आलेल्या प्रियकराने लाकडी बॅटने बेदम मारहाण करून खुन केल्याची...

दारूच्या नशेत घरात आलेल्या प्रियकराने लाकडी बॅटने बेदम मारहाण करून खुन केल्याची धक्कादायक घटना

मावळ : दारूच्या नशेत घरात आलेल्या प्रियकराचे लाकडी बॅटने बेदम मारहाण करून खुन केल्याची धक्कादायक घटना प्रेम संबंध ठेवण्याच्या कारणावरून १२ जून रोजी रात्री मावळ तालुक्यातील इंदोरी गावात घडली.

कमल रामदयाल मधुकर (३०, इंदोरी, मावळ. मूळ रा. छत्तीसगड) असे खून  झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी कमल याच्या बहिणीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संध्या आशिष पवार (३०, इंदोरी, मावळ) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार संध्या पवार ही सोशल मीडियावर रील स्टार आहे. ती विवाहित असून तिला एक मुलगी आहे. तिच्या घरासमोर गुप्ता फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसवर संध्या मजुरीचे काम करत होती. कमल मधुकर हा देखील मागील दोन वर्षांपासून त्याच फार्म हाऊसवर काम करत होते. त्याला चार मुले आहेत. एकत्र काम करत असताना कमल याचे संध्या हिच्या घरी जाणे-येणे होत असे. सुरुवातीला दोघांमध्ये ओळख झाली, ओळखीचे रूपांतर मैत्री आणि पुढे प्रेमात झाले.

दरम्यान, कमल हा दोन महिन्यांसाठी त्याच्या मूळ गावी बिलासपूर, छत्तीसगड येथे गेला. तो पुन्हा इंदोरी येथे आल्यानंतर त्याने संध्याकडे पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र आता संध्याने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी नकार दिला. कमल याच्याकडे दोघांचे व्हिडीओ, फोटो असल्याचे त्याने सांगितले. ते डिलीट करण्याची संध्याने विनंती केली. मात्र त्याने त्या बदल्यात प्रेम संबंध ठेवण्याची मागणी केली. १२ जून रोजी रात्री दहा वाजता कमल हा संध्याच्या घरी आला. त्याने पुन्हा संध्याकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला.

संध्याने कमल याचे हातपाय ओढणीच्या साहाय्याने बांधले. त्यानंतर मुलांच्या खेळण्यातील लाकडी बॅटने कमल याला ठिकठिकाणी मारहाण करून गंभीर जखमी केले. कमल बेशुद्ध पडल्याने संध्या त्याला घेऊन रुग्णालयात जात होती. मात्र रस्त्यातच कमल याचा मृत्यू (झाला. पोलिसांनी संध्या पवार हिला अटक केली आहे. तिला १८ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!