मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ‘मिशन मराठवाडा’ उपक्रम सुरू
वडगाव मावळ : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी ‘मिशन मराठवाडा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. “नातं रक्ताचं, विश्वासाचं आणि आधाराचं” या ब्रीदवाक्याखाली या अभियानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून, आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी विविध प्रकारच्या मदतीचे नियोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत पूरग्रस्तांसाठी महारक्तदान शिबिरे, घरबांधणी साहित्य, पशुधन, तसेच जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची जबाबदारी पत्रकार संघाने स्वीकारली आहे. या महायज्ञामध्ये नागरिक, समाजघटक आणि विविध संस्था यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे (मो. 9923846827) यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच विश्वासराव आरोटे (9423388508), नितीन शिंदे (9011699793), सचिन चपळगावकर (9923112712), पराग कुंठेळ (9822336356), बापू जगताप (9371717175) आणि विजय सुराणा (9822448825) यांच्याशीही थेट संपर्क साधता येईल.
या अभियानात मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बंधू-भगिनी सक्रिय सहभाग घेत आहेत. सचिन ठाकर (अध्यक्ष, मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघ) आणि संतोष थिटे (सचिव) यांनी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदत कार्यात हातभार लावण्याचे आवाहन केले आहे.
पूरग्रस्तांसाठी मदतीचे हात पुढे येणे हेच खरे सामाजिक बांधिलकीचे दर्शन असून, ‘मिशन मराठवाडा’ उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळणार आहे



















