मावळात हास्याचा जल्लोष – आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त वराळे येथे ‘चांडाळ चौकडीच्या करामती’!
मावळ (प्रतिनिधी):मावळ तालुक्यात हास्याचा महोत्सव रंगणार आहे! मावळचे लोकप्रिय जनसेवक आ. सुनीलआण्णा शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त वराळे गावात “जल्लोष – चांडाळ चौकडीच्या करामती” हा धमाल विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता वराळे फाटा येथील जुने तलाठी कार्यालय परिसरात पार पडणार आहे.

या विशेष कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत पल्लवीताई संपत दाभाडे (मा. सरपंच, माळवाडी ग्रामपंचायत) आणि संपत उर्फ संदीप दाभाडे (युवा नेते व उद्योजक). त्यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील महिला, भगिनी आणि ग्रामस्थांसाठी आनंद, मनोरंजन आणि एकतेचा जल्लोष अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत हा कार्यक्रम म्हणजे विनोद, नृत्य आणि संवादांची खमंग मेजवानी ठरणार आहे.

‘चांडाळ चौकडी’च्या कलाकारांकडून प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणाऱ्या करामती, विनोदी प्रसंग आणि समाजातील हलक्या-फुलक्या वास्तवावर आधारित सादरीकरणाचा आनंद मिळणार आहे.
कार्यक्रमात महिलांसाठी खास भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या बक्षिसांमध्ये –इलेक्ट्रिक गाडी, फ्रिज, LED टीव्ही, कुलर, ओव्हन मशीन यांसारख्या आकर्षक भेटवस्तूंचा समावेश आहे. तसेच उपस्थित प्रत्येक महिलेला एक आकर्षक गिफ्ट देण्यात येणार असल्याने उत्साह अधिकच वाढला आहे.

हा कार्यक्रम मावळकरांच्या एकत्र येण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा क्षण ठरणार आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना, विशेषत: महिलांना, कुटुंबासह उपस्थित राहून हास्य-आनंदाचा सोहळा अनुभवण्याचे आवाहन केले आहे.
“आ. सुनीलआण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा ‘जल्लोष’ म्हणजे मावळकरांसाठी आनंदाचा उत्सव आहे. हास्य, भेटवस्तू आणि एकतेचा आनंद एकत्र अनुभवूया.” — संपत (संदीप) दाभाडे, आयोजक




















