Homeताज्या बातम्यामावळ तालुक्याच्या माजी आमदार रुपलेखाताई ढोरे यांचे दुःखद निधन

मावळ तालुक्याच्या माजी आमदार रुपलेखाताई ढोरे यांचे दुःखद निधन

मावळ तालुक्याच्या माजी आमदार रुपलेखाताई ढोरे यांचे दुःखद निधन

वडगाव मावळ : मावळ तालुक्याच्या माजी आमदार तथा ज्येष्ठ सामाजिक व राजकीय नेत्या आदरणीय श्रीमती रुपलेखाताई दादासाहेब ढोरे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यातील राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरावर शोककळा पसरली आहे.
सन १९९५ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर मावळ विधानसभा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

आमदार म्हणून त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम केले. महिलांचे सक्षमीकरण, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी नेहमी ठाम भूमिका घेतली होती. साधी राहणी, स्पष्ट विचारसरणी आणि जनतेशी थेट संवाद ही त्यांची ओळख होती.

राजकीय जीवनासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांची कार्यपद्धत होती. त्यामुळेच पक्षभेद न ठेवता त्यांना सर्वसामान्य नागरिकांचा मान व आदर मिळत होता.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे सुपुत्र मनोज (भाऊ) ढोरे व सचिन (बाळ) ढोरे यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून, यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
रुपलेखाताई ढोरे यांच्या निधनाने मावळ तालुक्याने एक अनुभवी, कर्तव्यदक्ष व जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्व गमावले असून, त्यांच्या कार्याची आठवण मावळकरांच्या मनात कायम राहील, अशा भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!