मावळ तालुक्यातील उद्योजक व्यावसायिकांसाठी मेळावा नियोजन बैठक संपन्न
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील वडगाव येथे असणाऱ्या शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाष मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिकांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असून या संदर्भात सोमवार दिनांक १४जुलै २०२५ रोजी सकाळी १०: वाजता वडगाव येथे शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग विभागाचे सरचिटणीस महेंद्र शेलार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उद्योग विभाग अभिजीत आपटे, मावळ तालुका उपाध्यक्ष उद्योग विभाग उमेश रटाटे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















