मावळ तालुक्यातील तिकोणा ( वितंडगड) किल्ल्यावर रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत खासदार निलेश लंके सहभागी होणार
पवनानगर : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले तिकोणा ( वितंडगड) गडावर भव्य स्वच्छता मोहिमा. गड संवर्धन व जतन मोहीम राबवण्यात येणार आहे. रविवार दिनांक २७जुलै २०२५ रोजी सकाळी ७: वाजल्यापासून गडावरील पुरातन वस्तूसह परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. या स्वच्छता मोहिमेत अहिल्यानगर लोकसभेचे खासदार निलेश लंके हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती आपला मावळा संघटनेचे तळेगाव दाभाडे येथील समन्वयक अभिजीत सोनवणे यांनी दिली आहे.
आपला मावळा संघटनेच्या पुढाकाराने किल्ले तिकोणा वर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी नाश्ता. दुपारचे आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था आपला मावळा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तरी मावळ तालुक्यातील शिवप्रेमी. गडप्रेमी तरुणांनी आपली नोंदणी करून सदर मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आपला मावळा संघटनेचे समन्वयक अभिजीत सोनवणे यांनी केले आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















