Homeक्राईममावळ तालुक्यातील तिकोनापेठ येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार आरोपीच्या विरोधात लोणावळा ग्रामीण...

मावळ तालुक्यातील तिकोनापेठ येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार आरोपीच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या जवळील तिकोनापेठ येथे एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात रमेश रामदास वाघमारे( राहणार तिकोनापेठ तालुका मावळ जिल्हा पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता कलम 65(1) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2021(पोक्सो कायदा) च्या कलम 4.8.12. अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 169/2025 दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेली फिर्यादीनुसार ५ मे १०मे च्या दरम्यान रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या राहत्या घरात ही घटना घडली.

पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील आरोपी रमेश वाघमारे यांनी सदर मुलीला घरात बोलवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे या करत आहेत.

तिकोनापेठ येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!