मावळ लोकसभेचे महा संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते एक कोटी चाळीस लाख विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
लोणावळा (प्रतिनिधी):
मावळ लोकसभेचे लोकप्रिय आणि कार्यक्षम खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या एक कोटी चाळीस लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी लोणावळा शहरात उत्साहात पार पडले.

या निधीचा प्रस्ताव शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर यांच्या मागणीनुसार सादर करण्यात आला होता. शहरातील नांगरगाव, रामनगर आणि खंडाळा परिसरात पायाभूत सुविधा उभारणीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
खासदार निधीतून मंजूर झालेली कामे:
नांगरगाव येथे व्यायामशाळा बांधकाम – ₹20 लाख
नांगरगाव येथे रस्ता काँक्रीटकरण – ₹60 लाख
रामनगर येथे महिला मंडळ सभागृह व व्यायामशाळा बांधकाम – ₹20 लाख
खंडाळा येथे व्यायामशाळा बांधकाम – ₹20 लाख
खंडाळा येथे रस्ता काँक्रीटकरण – ₹20 लाख
या सर्व विकासकामांचे भूमिपूजन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, आर.पी.आय. महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे, मावळ तालुका प्रमुख राम सावंत, शहरप्रमुख संजय भोईर, माजी नगरसेविका कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, महिला आघाडी शहर संघटिका मनिषा भांगरे, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, तसेच शहरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच मा. उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, मा. नगरसेवक जीवन गायकवाड, ब्रिंदा गणात्रा, पूजा गायकवाड, रचना सिनकर, रंजना दुर्गे, रामभाऊ दुर्गे आदी नगरसेवक, युवासेना अध्यक्ष विवेक भांगरे, सल्लागार पराग राणे, उपशहर प्रमुख विनायक शिंदे, विशाल पाठारे, मंगेश येवले, विजय आखाडे, महिला आघाडी पदाधिकारी प्रिया पवार, अनिता गायकवाड, दिपाली शिरंबेकर तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

खंडाळा, रामनगर आणि नांगरगाव परिसरातील नागरिकांनी या विकासकामांचे स्वागत करत खासदार श्रीरंग बारणे आणि शहरप्रमुख संजय भोईर यांचे आभार मानले. या कामांमुळे स्थानिक नागरिकांना क्रीडा, आरोग्य व वाहतूक सुविधा अधिक सुलभ होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.




















