मोशी येथे कत्तलखाना उभारण्यास नागरिकांचा तीव्र विरोध. कत्तलखाना उभारण्याऐवजी तेथे गोशाळा उभारावी. आमदार महेश लांडगे यांची आग्रही भूमिका
पिंपरी चिंचवड: महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यामध्ये मोशी येथील नवीन गट नंबर ३२५( जुना गट नंबर ३२३) येथे कत्तलखाना साठी जागा आरक्षित केली आहे. या कत्तलखान्याला स्थानिक नागरिक. हिंदुत्ववादी संघटना. आणि भाजपा आमदार महेश लांडगे यांनी तीव्र विरोध केला असून सदर आरक्षणामध्ये बदल करून त्याच ठिकाणी गोशाळा उभारण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने नवीन प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला त्यावर सर्वसामान्य नागरिक व मोशी येथील भूमिपुत्र. लोकप्रतिनिधीं यांच्या हरकती सूचना मागवण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मोशी ग्रामस्थांनी ६ जुन २०२५ रोजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेतली. मोशी हे गाव ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे गाव असून येथे अनेक धर्म. जाती. पंथाचे लोक शांततेत राहत आहेत.
अशा गावात कत्तलखाना सुरू केल्यास सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. प्रशासनाचा हा निर्णय हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणार आहे तसेच सार्वजनिक. पर्यावरण. नागरी आरोग्य आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाने सदर कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करावे आणि त्या ठिकाणी गोशाळा सुरू करावी. मोशी गावामध्ये गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री नागेश्वर महाराज यांचे समाधी स्थळ आहे. तसेच या गावात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्राच्या मध्यवर्ती मोशी हे गाव असल्यामुळे सदर कत्तल खाण्याचे आरक्षण रद्द करावे.
अन्यथा मोशी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला होता. या संदर्भात आयुक्त शेखर सिंह यांनी ग्रामस्थांची भूमिका समजून घेतली. आमदार महेश लांडगे यांनी याबाबत मागणी केली आहे त्यानुसार सदर कत्तलखाना आरक्षण रद्द करण्यात येईल आणि त्या ठिकाणी गोशाळा व उभारण्यात येईल तसेच कत्तल खाण्याची जागा बदलण्यात येईल असे आश्वासन आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















