राजकुमार बिरादार यांनी रूडसेट संस्थेच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला
तळेगाव दाभाडे : येथील ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था( रुडसेट) येथे नवीन संचालक पदी कॅनरा बँकेचे वरिष्ठ प्रबंधक राजकुमार बिरादार यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. राजकुमार बिरादार हे तत्कालीन सिंडिकेट बँकेत कृषी अधिकारी म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली होती. याद्वारे त्यांनी महाराष्ट्र. कर्नाटक या राज्याच्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी कामकाज केलेले आहे.
त्यांची ग्रामीण भागाशी जोडलेली नाळ व त्यांचा अनुभव याचा फायदा रुडसेड संस्थेला होणार आहे. त्यावेळी त्यांचे स्वागत संस्थेत उपस्थित असलेले कर्मचारी व चालू असलेल्या ब्युटी पार्लर बॅच तर्फे करण्यात आले. राजकुमार बिरादार यांची संचालक पदी नियुक्ती झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















