लोणावळा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन
लोनावळा : राज्यात महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार पाहता महिलांच्या सुरक्षातेचा प्रश्न वारंवार उद्भवत आहे.आणि त्यात पुणे कोथरुड येथील नुकतीच घडलेली घटना पोलिस सुद्धा येथे अत्याचारी भूमिकेत असलेला दिसतोय यामुळे महिलांचा पोलिसांवरील विश्वास कोठेतरी कमी होत चाललेला आहे.पोलिस दादा आमचा रक्षण करता असावा पोलिसांनी आमुचे संरक्षण करावे.न्यायाच्या
दृष्टिकोनातून पाहून बहिणींना न्याय देण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस भाऊंनी सदैव आमच्या पाठीशी उभे राहो याचीच आर्त हाक म्हणुन लोणावळा ग्रामीण पोलिस उपअधीक्षक आणि शहर पोलिस स्टेशन पी आय व पोलिस कर्मचाऱ्यांना वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर महिलांच्या वतीने राखी बांधून रक्षा बंधन सण साजरा करण्यात आला
या वेळी वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर महीला कमिटी.तसेच पुणे अध्यक्ष सीमाताई भालेसइन पुणे जिल्हा महिला अध्यक्ष संगीता अवचर,(लोणावळा शहर अध्यक्ष) रत्नप्रभा देशपांडे.(महासचिव लो.शहर) अमृता रोकडे.(संघटक लो.शहर), नीता गायकवाड.(उपाध्यक्ष लो.शहर ), मिराताई मापारे.(कार्याध्यक्ष लो.शहर), माया मोरे.(संघटक लो.शहर), मंगल आखाडे विद्या साळवे, माया मोरे, वनिता भडकवाड, अनिता शिंदे, लोकेश भडकवाड, वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर अध्यक्ष संजय कांबळे, कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर, विशाल गायकवाड प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















