Homeमहत्त्वाचेवडगांव च्या सुधारित बिल्डर धार्जिण्या डी पी चा ग्रामस्थांनी केला कडाडून विरोध

वडगांव च्या सुधारित बिल्डर धार्जिण्या डी पी चा ग्रामस्थांनी केला कडाडून विरोध

वडगांव च्या सुधारित बिल्डर धार्जिण्या डी पी चा ग्रामस्थांनी केला कडाडून विरोध

वडगांव शहर भाजपा ने निवेदनाद्वारे केली बदल करण्याची मागणी वरिष्ठ अधिकारी यांना कळवून आवश्यक बदल पुन्हा करु असे मुख्याधिकारी आणि प्रशासक डॉक्टर प्रवीण निकम यांनी दिले आश्वासन

वडगांव मावळ : वडगांव पंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासन डॉ. प्रवीण निकम यांना दिलेल्या निवेदनामध्ये सुचित करण्यात आले की वडगांव नगरपंचायत यांचा नुकताच दुसरा विकास आराखडा प्रसिध्द झालेला आहे. सदर वडगांव शहराचा विकास आराखडा हा सामान्य जनतेवर अन्याय कारक असून तो धनदांडण्यासाठी धार्जिना आहे.

वडगांव मावळ येथील पोटोबा महराज दत्त, महादेव, मारूती देवस्थानास शासनाने ‘क’ दर्जा प्राप्त झालेला आहे. सदर देवस्थान हे तालुक्याचे श्रध्दास्थान आहे. भविष्याचा विचार करिता धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी जागेची आवश्यकता भासणार आहे, तरी पोटोबा देवस्थान यांच्या जमिनीवर तीन – तीन ठिकाणी आरक्षण टाकून सदर जागा बाधित केलेली आहे. आजुबाजुचे धनदांडगे बांधकाम व्यावसायिक यांच्या जागा शाबुत ठेवून देवस्थानच्या जागा मात्र आरक्षण टाकून बाधित केलेल्या आहेत.

सदर विकास आराखड्यामध्ये जैन बांधवाचे श्रध्दास्थान असलेले आणि साधुसंतांचे निवासस्थान असलेले तळ्याजवळील जैन स्थानक या वर जाणून बुजुन नव्याने आरक्षण दाखविण्यात आलेले आहे. तरी तमाम जैन बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर करून जैन स्थानकावरील आरक्षण तत्काळ हटविण्यात यावे ही मागणी देखील करण्यात आली.

वडगाव बाजारपेठेतील जुना पुणे मुंबई महामार्ग बाजारपेठेमध्ये पूर्व बाजूकडून वडगांव गावठाण हद्दीमध्ये पुढे वडगांव कोर्ट गेट नंबर १ पर्यंत १२ मीटर रूंदीचा असावा तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील गावठाण हद्दीतील श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर जवळील अंतर्गत रस्ता देखील ९ मीटर ऐवजी ६ मीटर करावा ही देखील आमची मागणी असल्याचे या निवेदनात नमूद केलेली आहे.

अनेक नागरिकांनी देखील यांचा आरक्षणाच्या बाबतीत असलेल्या तक्रारी या निमित्ताने नमूद केल्या तसेच नको असलेले आरक्षण तातडीने हटवावे यासाठी निवेदन देखील सादर केले.

या प्रसंगी तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, विश्वस्त सचिव अनंता कुडे, वडगांव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, विश्वस्त सुभाषराव जाधव, अरुण चव्हाण यांसह अनेकांनी आपली सार्वजनिक प्रश्नांबाबत भूमिका स्पष्टपणे मांडली ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर पगडे, प्रभाकर वाघमारे, पत्रकार विजयराव सुराणा , महादेव वाघमारे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे, मा.नगरसेवक किरण म्हाळसकर, भूषण मुथा, अनिल गुरव , मारुतीराव चव्हाण, जयसिंग चव्हाण , मधुकर चव्हाण, रामचंद्र चव्हाण, जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा , राजेश बाफना , अशोकलाल गुजराणी, गणेश भेगडे, विनायक भेगडे, रमेश ढोरे, गणेश दंडेल, शेखर वहिले, झुंबरलाल कर्नावट , पत्रकार विजय सुराणा , अनिल बाफना , सुरेंद्र बाफना , डॉ.कुंदन बाफना, दिलीप मुथा, अमोल बाफना , अमित मुथा , रोहन मुथा , सौरभ दुगम , प्रशांत चव्हाण

आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!