Homeमहत्त्वाचेवडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप

‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना आवश्यक विविध साहित्याचे प्रत्यक्ष भेट देऊन वाटप करण्यात आले. ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अंगणवाड्यांमधील बालकांसह सेविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

वडगाव शहरातील अंगणवाड्यांना मूलभूत सोयी-सुविधांनी अधिक सक्षम करण्यासाठी महिला व बालकल्याण समितीकडे विविध साहित्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत शहरातील विविध भागांतील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन आवश्यक साहित्याचे हस्तांतरण करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत गावठाण, मधुबन, ठाकरवस्ती, बाजारपेठ, मोरया कॉलनी आणि चव्हाणवाडा परिसरातील अंगणवाड्यांचा समावेश होता. बालकांना तसेच अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामकाजात सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने टेबल, खुर्च्या, चटया, कपाटे, कुंड्या, सरस्वती मूर्ती आणि धान्य कोठ्या आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक अंगणवाडीस प्रत्यक्ष भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते साहित्य सुपूर्द करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा अबोली ढोरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनिता ढोरे, उपसभापती पुनम भोसले, सदस्या वैशाली सोनवणे यांच्यासह संबंधित प्रभागातील नगरसेवक अनंता कुडे,  अजय भवार, नगरसेविका रुपाली ढोरे, अर्चना म्हाळसकर, महिला व बालकल्याण समितीच्या अधिकारी मनिषा चव्हाण, दिपाली ओव्हाळ, अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा अबोली ढोरे म्हणाल्या, “वडगाव शहरातील अंगणवाड्यांना सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी तसेच बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिला व बालकल्याण समिती आणि नगरपंचायत प्रशासन भविष्यातही सातत्याने कटिबद्ध राहील. बालकांना चांगले आणि पोषक वातावरण मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.”

अंगणवाडी ही बालकांच्या शैक्षणिक, सामाजिक व शारीरिक विकासाची प्राथमिक पायाभरणी करणारी महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यामुळे या केंद्रांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच बालकांना आनंददायी व सुरक्षित वातावरण मिळणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने नगरपंचायतीने घेतलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

नगरपंचायतीच्या या उपक्रमामुळे अंगणवाड्यांमधील सुविधा अधिक सक्षम होऊन बालकांना आणि सेविकांना दैनंदिन कामकाजात मोठी मदत होणार आहे. अंगणवाडी सक्षमीकरणासाठी नगरपंचायतीने घेतलेल्या या स्तुत्य पावलाबद्दल उपस्थित अंगणवाडी सेविकांनी नगरपंचायत प्रशासन व महिला व बालकल्याण समितीचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

न्यायालयाच्या आवारातून आरोपीची पोलीस कोठडीतून धाडसी पळ काढण्याची घटना; आणखी एक गुन्हा दाखल

न्यायालयाच्या आवारातून आरोपीची पोलीस कोठडीतून धाडसी पळ काढण्याची घटना; आणखी एक गुन्हा दाखल   वडगाव मावळ, दि. २८ (प्रतिनिधी): वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आवारातून...

error: Content is protected !!