Homeमहत्त्वाचेवडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी महावितरण कंपनी मर्यादित आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. ७ मे २०२६ रोजी एकदिवसीय ‘ग्राहक तक्रार निवारण’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ऊर्जा बैठक’ या नावाने आयोजित हा मेळावा वडगाव मावळ येथील द्वारकाधीश लॉन्स येथे पार पडणार आहे.

या मेळाव्याचा मुख्य उद्देश वडगाव उपविभागातील घरगुती, व्यावसायिक, सोलर रूफटॉप, कृषी तसेच पॉलीहाऊस ग्राहकांच्या विविध तक्रारींचे जागेवरच निवारण करणे हा आहे. वीज देयकांमधील त्रुटी, नवीन जोडणीसाठीचे अर्ज, तांत्रिक बिघाड, तसेच इतर प्रशासकीय अडचणी यांसारख्या समस्यांमुळे अनेक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, या सर्व बाबींवर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मेळाव्यात वीजबिल दुरुस्ती, नवीन वीज जोडणी, नाव किंवा भार बदल, बंद किंवा नादुरुस्त मीटर बदलणे तसेच इतर तांत्रिक व प्रशासकीय तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे. ग्राहकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात तीन प्रतींमध्ये आवश्यक कागदपत्रांसह सादर कराव्यात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सदर मेळावा सकाळी १०:३० ते सायंकाळी ४:३० या वेळेत होणार असून, वडगाव उपविभागातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!