Homeमहत्त्वाचेवडगाव शहरातील मोकाट कुत्र्यांवर बंदोबस्त करावा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...

वडगाव शहरातील मोकाट कुत्र्यांवर बंदोबस्त करावा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवेदन

वडगाव शहरातील मोकाट कुत्र्यांवर बंदोबस्त करावा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवेदन

वडगाव, दि. १८ सप्टेंबर : वडगाव शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना या कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर, चौकात व सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचे झुंडीने वावरणे आता नेहमीचे झाले आहे. अचानक रस्ता अडवून वाहनधारकांवर धावून जाणे, लहान मुलांचा पाठलाग करणे, चावण्याच्या घटना यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे.

मागील वर्षी एका मोकाट कुत्र्याच्या हल्यात एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोळ्याचे शस्त्रक्रियाही करावी लागली होती. त्यामुळे या प्रश्नाची गंभीरता अधिक वाढली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरात दरवर्षी मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. ही कुत्री नेमकी येतात तरी कोठून, याचा शोध घेऊन त्यावर त्वरित बंदोबस्त करावा. केवळ नागरिकांना आश्वासने न देता प्रत्यक्ष कारवाईची गरज आहे.

या निवेदनावर तब्बल ५० हून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठींबा दर्शविला आहे. वाढत्या समस्येवर नगरपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

यावेळी निवेदन सादर करताना मावळ तालुका प्रभारी अतुल राऊत, मावळ युवक अध्यक्ष विशाल वहिले, वडगाव शहराध्यक्ष सोमनाथ धोंगडे, युवक अध्यक्ष सुनिल चव्हाण, सोशल मीडिया अध्यक्ष राहील तांबोळी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोकाट कुत्र्यांमुळे होणारे अपघात, हल्ले व नागरिकांमध्ये निर्माण झालेले भय लक्षात घेता, नगरपंचायत प्रशासनाने निर्बंधात्मक कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!