Homeमहत्त्वाचेविठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे यांची पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र दिले असून त्यात विठ्ठलराव शिंदे यांच्यावर मावळ, मुळशी, भोर आणि राजगड या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

विठ्ठलराव शिंदे हे मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे जुने जाणते नेतृत्व असून स्थापनेपासून पक्षात सक्रीय आहेत. आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू आणि अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे विठ्ठलराव शिंदे यांच्यावर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली ही जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या विठ्ठलराव शिंदे यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असून मावळ, मुळशी, भोर व राजगड या तालुक्यांची जबाबदारी देण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच, पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाचे ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य राहील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पत्रातून व्यक्त केला आहे.

विठ्ठलराव शिंदे यांच्या या नियुक्तीबद्दल आमदार सुनील शेळके यांनी विठ्ठलराव शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच प्रतिक्रिया देताना, मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या संघटन बांधणीत आणि पक्षाचे ध्येयधोरण तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विठ्ठलराव शिंदे हे सातत्याने प्रयत्नशील असतात. आता त्यांच्या नेतृत्वात चारही तालुक्यात पक्षाचा विस्तार अधिक जोमाने होईल, असे म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!