शाळेची स्वच्छता करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी. मुख्याधिकारी यांना शिवसैनिकांनी दिले निवेदन
तळेगाव दाभाडे : स्टेशन विभागातील नगर परिषदेची शाळा संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक ६ या शाळेची साफसफाई करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे जिल्हा उपसंघटिका संगीता सोनावणे, शिवसेना मावळ तालुका समन्वयक सतीश गरुड, सुनील नाना करंजे, अक्षय वाघमारे, कुणाल चव्हाण, शितल जाधव, अनिकेत बाराते, जितू कदम, पांडुरंग पाटील, अनिल पाटील, सुभाष केदारी, अशोक जाधव आदी शिवसैनिकांनी केली आहे.
शाळेच्या आवारात व स्वच्छतागृहात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता पसरली असून शाळेत डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. या अस्वच्छतेमुळे विविध आजार पसरू शकतात आणि विद्यार्थ्यांचे शिक्षणही बाधित होऊ शकते. स्वच्छता ही केवळ शाळेचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नाहीतर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हि आहे.
म्हणून कचरा व्यवस्थापनासाठी योग्य व्यवस्था करावी तसेच स्वच्छतागृहामध्ये नियमित स्वच्छता ठेवावी याकरिता शाळेत सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा मागणीचे निवेदन शिवसैनिकांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व प्रशासकीय अधिकारी शिल्पा रोडगे यांना दिले आहे.
या संदर्भात बोलताना शिवसेना मावळ तालुका समन्वयक सतीश गरुड म्हणाले की सदरील निवेदनाची त्वरित दखल घेऊन शाळेत सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















