Homeमहत्त्वाचेशिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

मावळ : मावळ तालुक्यातील आंदर मावळ परिसरातील शिंदे घाटेवाडी येथील शिवजयंती तरुण मंडळाचे कार्यकर्ते विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी जात असताना झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे घाटेवाडी येथील शिवजयंती तरुण मंडळाचे काही कार्यकर्ते पारंपरिक पद्धतीने विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी दुचाकीवरून रवाना झाले होते. दरम्यान, पुणे–मुंबई महामार्गावरील नायगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयासमोर MH 14 JA 5111 क्रमांकाच्या शिफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दर्शन बाबू शिंदे (वय १५) आणि ओमकार दत्ता आढळे (वय २३) हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या तीव्रतेमुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवले असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

शिवजयंती उत्सवासाठी शिवज्योत आणण्याच्या पवित्र कार्यासाठी निघालेल्या तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने शिंदे घाटेवाडी तसेच संपूर्ण आंदर मावळ परिसरावर शोककळा पसरली आहे. गावातील तरुण, ग्रामस्थ आणि शिवभक्तांनी या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!