Homeसामाजिकश्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर बससेवेचा शुभारंभ भाविकांसाठी दिलासादायक पाऊल...

श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर बससेवेचा शुभारंभ भाविकांसाठी दिलासादायक पाऊल – दिवसातून सात फेऱ्या धावणार

श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर बससेवेचा शुभारंभ

भाविकांसाठी दिलासादायक पाऊल – दिवसातून सात फेऱ्या धावणार

श्रीक्षेत्र देहू : वारकरी भाविक आणि नागरिकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) तर्फे श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर या नव्या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पवित्र देहूनगरीपासून त्यांच्या तपोभूमी असलेल्या भंडारा डोंगरापर्यंत प्रवास सोयीस्कर करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण सेवा सुरू झाली आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून वर्षभर भाविक देहू, आळंदी व भंडारा डोंगर येथे दर्शनासाठी येत असतात. आतापर्यंत भाविकांना भंडारा डोंगरावर जाण्यासाठी तीस ते चाळीस मिनिटांचा पायी प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. नव्या बससेवेच्या माध्यमातून या सर्वांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास आता सोपा आणि सुरक्षित होणार आहे.

या मार्गावर दिवसभरात एकूण सात फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे वारकरी व भाविकांना वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून एकाच दिवशी दोन्ही तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याची संधी सुलभ झाली आहे.

या नव्या बससेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष माऊली दाभाडे, मावळ भाजप नेते रविंद्र भेगडे आणि भंडारा डोंगर संस्थांचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब महाराज काशीद यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून बससेवेचे लोकार्पण करण्यात आले.

या उपक्रमामुळे भाविक व नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. धार्मिक पर्यटनाला चालना मिळून देहू व भंडारा डोंगर या तीर्थक्षेत्रांचा आध्यात्मिक व सामाजिक महत्त्वाचा प्रवाह अधिक गतिमान होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!