Homeमहत्त्वाचेश्री क्षेत्र घोरवडेश्वर डोंगरावरून १६ वर्षीय मुलगी दरीत पडली

श्री क्षेत्र घोरवडेश्वर डोंगरावरून १६ वर्षीय मुलगी दरीत पडली

शेलारवाडी (ता. मावळ) : मावळ तालुक्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक घोरवडेश्वर डोंगरावर मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. दर्शनासाठी आपल्या पालकांसह आलेली १६ वर्षीय मुलगी पाय घसरून तब्बल ७० ते ८० फूट खोल दरीत कोसळली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथे एकच खळबळ उडाली.

घटना कळताच श्री क्षेत्र घोरवडेश्वर देवस्थानचे महंत अमरनाथ बाबा यांनी कोणतीही वेळ न दवडता थेट दरीत उतरून मोठे धाडस दाखवले. मुलीच्या हाता-पायांना किरकोळ दुखापत झाली होती आणि पडल्यामुळे ती स्वतः वर येऊ शकत नव्हती. मात्र अमरनाथ बाबा यांनी सर्व धोका पत्करून त्या मुलीपर्यंत पोहोचत तिला सुरक्षित वर आणले.

यावेळी अमरनाथ बाबांना घोरवडेश्वर देवस्थानचे पुजारी हरी महाराज बोडके, पुरातत्व विभागाचे कर्मचारी संदीप पडवळ व रोहित कुमार, शिवभक्त नंदकुमार बोडके व त्यांचा मुलगा, तसेच प्रसाद कोळी यांनी प्रत्यक्ष मदत केली. सर्वांच्या मदतीने मुलगी सुखरूपपणे दरीतून बाहेर आली.

धाडसी बचावकार्य पाहून उपस्थित भाविकांनी आणि मुलीच्या पालकांनी अमरनाथ बाबा यांचे मनःपूर्वक आभार मानले. “तुमच्यामुळे आमची मुलगी सुखरूप आम्हाला मिळाली,” अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

वडगाव मावळ (ता. मावळ, जि. पुणे) | दि. २५ एप्रिल २०२६ केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला केशवनगर...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | दि. २५ एप्रिल २०२६ चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले वडगाव मावळ परिसरात एका विवाहित महिलेच्या...

कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

सह्याद्री नामा | वडगाव मावळ | दि. २३ कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन वडगाव मावळ : मावळ तालुका...

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात वडगाव मावळ दिनांक : २१ एप्रिल २०२६ येथील न्यू इंग्लिश स्कूलला...

error: Content is protected !!