Homeसामाजिकश्री डोळसनाथ महाराज मंदिरात कुमारिका पूजन सोहळा उत्साहात साजरा

श्री डोळसनाथ महाराज मंदिरात कुमारिका पूजन सोहळा उत्साहात साजरा

तळेगाव दाभाडे: शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर येथे शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्ट तर्फे शारदीय नवरात्री निमित्ताने कुमारीका पूजा. भोंडला.दांडिया. फुगडी. हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात तळेगाव दाभाडे शहरातील सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक शाळा क्रमांक चार मधील१२५ विद्यार्थिनींनी व परिसरातील महिला भगिनींनी उत्साहाने सहभाग घेतला.

या कार्यक्रमात भोंडल्याची गाणी गात आनंदोत्सव साजरा केला. ह्या वेळी परिसरातील महिला, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता तिकोने, शिक्षिका निकिता शितोळे, प्राची लोमटे, वैशाली साबळे, ताहेरा बासडे, सोनाली घाटे आणि शिक्षकवृंद उपस्थितीत होत्या.

या कार्यक्रमाप्रसंगी सर्व मुलींना कुमारिका वाण म्हणून सावंत नांनीनी शालेय वस्तू भेट दिल्या. खिरापत, साखर फुटाणे, भेळ व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.अशा कार्यक्रम उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना समाजात वावरण्याची संधी मिळावी, त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहावे आणि आत्मविश्वास वाढावा हा ट्रस्टचा उद्देश असल्याचे श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्टचे विश्वस्त राजेश सरोदे यांनी यावेळी सांगितले.

तसेच बुधवार दिनांक १ ऑक्टोंबर२०२५ रोजी श्री डोळसनाथ महाराज मंदिरात नवचंडी याग(होम), भजन हरिपाठ, देवीचा जोगवा, देवीसूक्त,देवीचा मंत्रजप, कालभैरवाष्टक,आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.

प्रतिनिधी:गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!