श्री स्वामी विवेकानंद क्रीडांगण खेळांचेच नव्हे, संस्कारांचेही मैदान
तळेगाव दाभाडे – शहरातील कडोलकर कॉलनीसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण. दीर्घकाळापासून जपलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून, कडोलकर कॉलनी रहिववाशी संघाच्या एकत्रित प्रयत्नांतून “श्री स्वामी विवेकानंद क्रीडांगण साकार झाले आहे.

या क्रीडांगणाच्या उभारणीमागील उद्देश फक्त खेळासाठी सुविधा उपलब्ध करून देणे नव्हते. तरुणांना योग्य दिशा देणे, शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती साधणे, संघभावना आणि शिस्त अंगीकारणे – हेच खरे ध्येय होते.
स्वामी विवेकानंदांचे उद्गार आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत –”मन, बुद्धी आणि शरीर यांचा समतोल साधण्यासाठी क्रीडा अत्यावश्यक आहे.”
खेळ ही केवळ शारीरिक क्रिया नाही; ती आत्मविश्वास, चिकाटी आणि एकात्मतेचा धडा शिकवणारी जीवनशाळा आहे.

खेळ फक्त शारीरिक क्रिया नाहीत, तर आत्मविश्वास, चिकाटी, संघभावना, शिस्त आणि नेतृत्वाची साधने आहेत. क्रीडांगण हे शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक विकास यांचा समतोल साधण्याचे ठिकाण आहे.
ही साधना किंवा सुविधा काही व्यक्तींची मक्तेदारी नाही; हे एकत्रित इच्छाशक्ती, सहकार्य आणि समाजाच्या सहभागाचे प्रतीक आहे.
“प्रत्येक घरातून, प्रत्येक कुटुंबातून मिळालेला हातभार”
प्रत्येक युवकाचा उत्साह
मातृशक्तीचे पाठबळ
या सर्वांमुळे हा प्रकल्प यशस्वी झाला आहे.
खेळाडू तयार करणे जितके महत्त्वाचे आहे, तितके तरुणाईत शिस्त, संयम आणि संस्कार घडवणे.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा – “मन, बुद्धी आणि शरीर यांचा समतोल साधण्यासाठी क्रीडा अत्यावश्यक आहे.”
“परिसरातील आरोग्य आणि जीवनशैली”
क्रीडांगणाच्या माध्यमातून आरोग्यपूर्ण वातावरण निर्माण करणे
मातीशी जोडलेले खेळ पुनर्जीवित करणे
समाजात सकारात्मक जीवनशैलीला चालना देणे
“संस्कारभूमी म्हणून क्रीडांगण”
फक्त खेळांचे मैदान नसून, भविष्याच्या पिढ्यांना संस्कार, शिस्त आणि स्वप्नांना योग्य दिशा देणारी संस्कारभूमी आहे.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक अमोल शेटे, सामाजिक कार्यकर्ते विनित भेगडे, संतोष भोसले, चित्रपट कलावंत गणेश टाव्हरे, उद्योजक महेश काळे, आशितोष हेद्रे .तुषार खेरडे.कामगार नेते दत्तात्रय भेगडे .आणि कडोलकर कॉलनीसह परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो ९९२१८०७०११



















