Homeमहत्त्वाचेसर्पमित्रांना ओळख पत्रासह १० लाख रुपयांचा विमा

सर्पमित्रांना ओळख पत्रासह १० लाख रुपयांचा विमा

सर्पमित्रांना ओळख पत्रासह १० लाख रुपयांचा विमा

ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी विशेषतः सर्पा पासुन होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि १० लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे. या सर्पमित्रांना अत्यावश्यक सेवा आणि फ्रंट लाईन वर्कर म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल अशी माहिती मंत्रालय दालनातील बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या त्रासातून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सर्पमित्र नेहमीच धावून येतात. अनेकदा जीव धोक्यात घालून सर्पाना पकडून सुरक्षित स्थळी सोडून देतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना अपघात विमा मिळावा अशी बऱ्याच काळापासून मागणी होती. सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र देण्याबरोबरच त्यांना १० लाख रुपयाचा अधिकृत विमा देण्यासाठी सविस्तर कार्यपद्धती तयार केली जाईल.

या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला अधिकृत मान्यता मिळेल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. सर्व सर्पमित्रांची अधिकृत माहिती उपलब्ध होण्यासाठी एक विशिष्ट पोर्टल तयार करण्यात येणार आहे. ही सर्व माहिती वनविभागाच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे गरजूंना तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधने सोपे होईल.

आणि त्यांच्या कामात अधिक पारदर्शकता येईल या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल आणि वन्यजीव संरक्षणात त्यांचा सहभाग अधिक वाढेल अशी अपेक्षा अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात मंत्रालय दालनात झालेल्या बैठकीला वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वन्यजीव संरक्षक एम. श्रीनिवासराव, अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणी मित्र संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक संभाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

सर्पमित्रांना ओळखपत्रासह १० लाख रुपयाचा विमा मिळणार असल्याने राज्यातील सर्पमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या संदर्भात बोलताना सर्पमित्र गणेश भेगडे म्हणाले की सर्पमित्रांच्या कार्याची दखल सरकारने घेतली आहे सर्व सर्प मित्रांकडून सरकारचे आभार.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!