Homeसामाजिकसांगवीत समस्त ग्रामस्थ व प्रशांत दादा भागवत युवा मंचतर्फे “मनोरंजन संध्या...

सांगवीत समस्त ग्रामस्थ व प्रशांत दादा भागवत युवा मंचतर्फे “मनोरंजन संध्या 2025” उत्साहात साजरी

सांगवीत समस्त ग्रामस्थ व प्रशांत दादा भागवत युवा मंचतर्फे

“मनोरंजन संध्या 2025” उत्साहात साजरी

सांगवी (ता. मावळ):
सांगवी ग्रामस्थ व प्रशांत दादा भागवत युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “मनोरंजन संध्या 2025” हा बहारदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ घडवणाऱ्या या सोहळ्याला महिला, ग्रामस्थ व मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रम संस्मरणीय केला.

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

संपूर्ण कार्यक्रमात महिलांचा उत्साह लक्षणीय होता. पारंपरिक उखाणे, मनोरंजक प्रश्नमंजुषा, गमतीशीर खेळ, विचित्र हास्य स्पर्धा, गप्पागोष्टी आणि धमाल खेळांनी वातावरण रंगतदार झाले. महिलांनी केलेल्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण सभागृहात हशा आणि टाळ्यांचा कडकडाट घुमला.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला मा. सरपंच  मनीषाताई लालगुडे, मा. सदस्य  महादूनाना खांदवे, मा. उपसरपंच रखाबाई भोईर, मा. कुंदाताई खांदवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
तसेच ऋषिकेश लालगुडे, नवनाथ तोडकर, विकास लालगुडे, रोहित खांदवे, संभाजी तोडकर, मनोज खांदवे, दिनेश लालगुडे, किरण लालगुडे, श्री. राजाराम ओव्हाळ, गणेश ओव्हाळ, अभिषेक खांदवे, कानिफनाथ तोडकर, सुधाकर लालगुडे, अक्षय तोडकर, शेखर तोडकर आदींची विशेष उपस्थिती लाभली.

प्रशांत दादांच्या जनसंपर्क मोहिमेला बळ

या कार्यक्रमाद्वारे महिलांनी व ग्रामस्थांनी प्रशांत दादा भागवत यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष ठरला. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचा प्रभाव वाढत असल्याचे या सोहळ्यातून अधोरेखित झाले. युवा मंचाच्या माध्यमातून ग्रामीण भागात होत असलेल्या उपक्रमांमुळे महिलांच्या सामाजिक सहभागाला चालना मिळत असून, गावोगावी सकारात्मक वातावरणाची निर्मिती होत आहे.

“ग्रामविकासासाठी महिलांचा सहभाग अत्यावश्यक असून, त्यांच्या उत्साही सहभागातून समाज परिवर्तनाला दिशा मिळते,” असे प्रशांत दादा भागवत यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

अविस्मरणीय सोहळा

संपूर्ण सांगवी परिसरातील महिला व ग्रामस्थांची उपस्थिती, त्यांचा उत्साह, आणि युवा मंचाच्या उत्तम आयोजनामुळे “मनोरंजन संध्या 2025” हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. ग्रामस्थांमध्ये ऐक्य, उत्साह व नवचैतन्य निर्माण करून या कार्यक्रमाने सांगवीच्या सांस्कृतिक परंपरेत नवा अध्याय लिहिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!