Homeसामाजिकसोमाटणे फाटा येथील ट्राफिक समस्येवर आठ दिवसात तोडगा काढा अन्यथा तीव्र आंदोलन...

सोमाटणे फाटा येथील ट्राफिक समस्येवर आठ दिवसात तोडगा काढा अन्यथा तीव्र आंदोलन उभारू. बाळासाहेब घोटकुले व सर्वपक्षीयांचा इशारा

सोमाटणे फाटा येथील ट्राफिक समस्येवर आठ दिवसात तोडगा काढा अन्यथा तीव्र आंदोलन उभारू. बाळासाहेब घोटकुले व सर्वपक्षीयांचा इशारा

सोमाटणे फाटा : मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे रोजच प्रचंड प्रमाणावर वाहतूक कोंडी होते त्यामुळे शेतकरी. कामगार. विद्यार्थी. रुग्णवाहिका आदींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सोमाटणे फाटा येथील ट्राफिक समस्येवर येत्या आठ दिवसात कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा भाजपा व सर्वपक्षीयांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारू असा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांनी दिला आहे.

ट्राफिक समस्या संदर्भात तहसील कार्यालय. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन व देहूरोड वाहतूक पोलीस चौकी यांना निवेदन देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील महत्त्वाचा सोमाटणे फाटा चौक हा सुमारे ६५ गावांना जोडणारा मुख्य मार्ग असून, येथे दररोज भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या चौकातून शेतकरी, दुग्धव्यावसायिक, नोकरदार वर्ग, रुग्णवाहिका तसेच औद्योगिक कंपन्यांचा माल मोठ्या प्रमाणावर ये-जा करतो.

परंतु, ट्रॅफिकच्या समस्येमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या ठिकाणी पवना हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल अशी महत्त्वाची रुग्णालये असतानाही, एमर्जन्सी रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडथळे येतात. शेतकरी आणि दुग्धव्यावसायिकांना आपला माल बाजारपेठेत वेळेत पोहोचविणे कठीण झाले आहे. तर नोकरदार वर्गाला रोज नोकरीवर उशीर होतो, तसेच परिसरातील उर्से व बेबडओहोळ येथील मोठ्या औद्योगिक कंपन्यांचे कच्चा माल व तयार माल वाहतुकीत अडथळा निर्माण होतो.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायमस्वरूपी ट्रॅफिक कंट्रोलिंग ऑफिसरची नेमणूक आणि चौकात सिग्नल बसविणे आवश्यक असल्याची मागणी घोटकुले यांनी केली आहे.याप्रसंगी पवन मावळ भाजपा मंडलाध्यक्ष दत्तात्रय माळी, मावळ तालुका भाजपाचे उपाध्यक्ष राजेश मुर्हे, सांगवडेचे सरपंच रोहन जगताप, रामभाऊ गोपाळे, प्रदीप वाजे, नवनाथ गायकवाड, महेश भोईर, कल्पेश राक्षे, संकेत सस्ते आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!