Homeसामाजिक७९ वा स्वातंत्र्यदिन सोहळा आश्रमशाळेत मोठ्या उत्साहात संपन्न

७९ वा स्वातंत्र्यदिन सोहळा आश्रमशाळेत मोठ्या उत्साहात संपन्न

७९ वा स्वातंत्र्यदिन सोहळा आश्रमशाळेत मोठ्या उत्साहात संपन्न

कामशेत : येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत ७९वा स्वातंत्र्य दिन सोहळा आज शुक्रवार दिनांक १५ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:वाजता शाळेच्या मैदानावर स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. टाटा मोटर्स कर्मचारी पतसंस्थेचे संचालक व उपाध्यक्ष, लोहगड विसापूर विकास मंच प्रमुख  सचिन ज्ञानेश्वर टेकावडे, वास्तु विशारद संघाचे स्वयंसेवक मयूर राजगुरव, निर्मल वारीचे संयोजक संतोष गोविंदराव लोणकर, शाळा समितीचे सदस्य धनंजय वाडेकर, तसेच विक्रमशेठ बाफना, युवा उद्योजक युवराज शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शंकरनाना शिंदे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप वाजे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे या सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

प्रमुख पाहुणे मयूर राजगुरव व सचिन टेकावडे यांच्या हस्ते ध्वज पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पालक व कामशेत येथील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक मुख्याध्यापक प्रदीपजी वाजे सर यांनी केले कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय शाळेतील ज्येष्ठ शिक्षक  पंढरीनाथ वाडेकर सर यांनी करून दिला जयश्री सांबरी, तन्मय पिचड, कोमल गावडे, पूजा ठाकर व हिंदवी लोहार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे संतोष लोणकर यांनी सर्व प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ध्वजाचा अर्थ, आपण सातशे वर्ष गुलामगिरी मध्ये कशाप्रकारे होतो हे त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले

प्रमुख पाहुणे सचिन टेकावडे यांनी आपल्या मनोगतातून लोहगड किल्ल्या विषयीचा इतिहास व लोहगड किल्ला युनोस्को च्या यादीमध्ये त्याची नोंद झाली तसेच महाराष्ट्रातील इतर 11 किल्ल्यांची देखील नोंद घेण्यात आली आहे. असे आपल्या मनोगतातून आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.

आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून ऐश्वर्याताई भूषण रणदिवे (आयुक्त मुंबई )यांनी विद्यार्थ्यांना ‘वाचनाई’ या पुस्तकाची मराठी व इंग्रजी आवृत्ती असलेली पुस्तके दिली त्यांचेही पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली हर घर तिरंगा या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत देखील करण्यात आले. १३ ऑगस्ट व १४ऑगस्ट रोजी शाळेमध्ये ध्वज फडकवण्यात आला. हर घर तिरंगा या कार्यक्रमांमध्ये शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक यांनी देखील आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक अजित डुंबरे यांनी केले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!