
“डेंटल इम्प्लांट” म्हटलं की डॉ. माने.
दातांच्या अत्याधुनिक उपचारांचे नवे केंद्र आता तळेगावात
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या दातांविषयक उपचारांची सुविधा मिळावी, या उद्देशाने डॉ. प्रविण माने आणि डॉ. वर्षा माने यांनी दंतचिकित्सेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नवे “माने डेंटल सुपर स्पेशालिटी क्लिनिक” सुरू केले आहे. तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकात विस्तृत व आधुनिक वास्तूमध्ये सुरू झालेले हे क्लिनिक आता डेंटल इम्प्लांटपासून जबड्याच्या सीटी स्कॅनपर्यंत सर्व उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून देत आहे.


या क्लिनिक मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उपलब्ध नसलेला सीबीसीटी (Cone Beam Computed Tomography) स्कॅनर बसवण्यात आला आहे. या यंत्राद्वारे जबड्याच्या हाडांचा अचूक त्रिमितीय (3D) स्कॅन घेतला जातो, ज्यामुळे इम्प्लांट बसवताना शस्त्रक्रियेमध्ये अचूकता आणि सुरक्षितता सुनिश्चित होते.
डॉ. प्रविण माने यांच्या मते, “पूर्वी रुग्णांना अशा स्कॅनसाठी पुणे किंवा पिंपरी चिंचवड जावे लागायचे. आता तळेगावातच ही सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास वाचणार आहे.”


या क्लिनिकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दातांच्या विविध शाखांतील दहा एमडीएस सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स एकत्र कार्यरत आहेत. यात ऑर्थोडॉन्टिक्स, एंडोडॉन्टिक्स, पेरिओडॉन्टिक्स, ओरल सर्जरी, प्रोस्थोडॉन्टिक्स यांसारख्या शाखांतील तज्ञांचा समावेश आहे. त्यामुळे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांना तज्ज्ञ उपचार मिळणे सुलभ झाले आहे.
डॉ. मानेंनी सांगितले की, “डेंटल इम्प्लांट म्हणजे गमावलेल्या दातांच्या जागी जबड्याच्या हाडात टायटॅनियम स्क्रू बसवून त्यावर कायमस्वरूपी दात बसवणे ही पद्धत सध्या जगभरात सर्वाधिक यशस्वी मानली जाते. ही प्रक्रिया आता तळेगावातच पूर्णपणे केली जाणार आहे.”


या क्लिनिकमध्ये स्कॅनपासून नियोजन, शस्त्रक्रिया आणि फिक्स दात बसवण्यापर्यंत सर्व प्रक्रिया डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामुळे उपचार जलद, अचूक आणि दीर्घकालीन टिकाव असलेले ठरतात.
नवीन क्लिनिकमध्ये रुग्णांच्या सोयीसाठी प्रशस्त प्रतीक्षागृह, अत्याधुनिक दंतखोली, डिजिटल एक्स-रे, स्टेरिलायझेशन युनिट, आणि पूर्णतः स्वच्छ, सुरक्षित वातावरण तयार करण्यात आले आहे. रुग्णांच्या उपचारानंतर योग्य फॉलो-अप आणि मार्गदर्शनासाठी विशेष सॉफ्टवेअरद्वारे नोंदी ठेवण्याची सुविधाही येथे आहे.
या क्लिनिक मुळे तळेगाव तसेच मावळ परिसरातील रुग्णांना आता मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज उरणार नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळाल्याने या भागातील दंतचिकित्सा क्षेत्रात मोठी झेप घेतली गेली आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे=मो९९२१८०७०११




