वडगांव मावळ येथे मनस्विनी महिला मंचाचा सातवा वर्धापन दिन पार पडला
वडगांव मावळ येथे मनस्विनी महिला मंचाचा सातवा वर्धापनदिन 2 अगस्त २०२५ रोजी ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरात वडगावांतील नामांकित मान्यवर आणि शेकडो महिला वर्गाच्या उपस्थितीत, मोठ्या जल्लोषात पार पडला.
मंचातील सर्व सदस्यांनी स्वतःचं नियोजन करून फेर, झिम्मा, फुगडी, गोफ, पिंगा ह्यांसारखे पारंपारिक श्रावणातील मंगळागौरचे खेळ सादर केले.
कित्येक खेळांना वन्स मोअर मिळवत उपस्थित महिला वर्गाची मनेही जिंकली. कार्यक्रमाचे नियोजन संगिता ढोरे, पुजा पिंगळे, मयुरी राऊत, अश्विनी बवरे, आरती राऊत, वैशाली म्हाळस्कर, शितल मुथा, पुनम ढोरे अर्चना कुडे, शैला शिंदे, सपना कुडे, मयुरी कुडे, सारिका भिलारे, वैशाली पिंगळे, विशाखा कुलकर्णी, किरण आगळे, धनश्री भोंडवे, कांचन ढमाले, माधवी बोरावके, भक्ती जाधव यांनी केले.
तर सूत्रसंचालन हर्षदा दुबे यांनी तर उपस्थित महिलांचे स्वागत, प्रस्तावना मंचाच्या संस्थापक अध्यक्षा वैशालीताई श्याम ढोरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्रेया पवन भंडारी यांनी मानले.




















