Homeसामाजिकतळेगावात श्री संत ज्ञानेश्वर महाराज सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य पालखी सोहळा

तळेगावात श्री संत ज्ञानेश्वर महाराज सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य पालखी सोहळा

तळेगाव दाभाडे : शहरात नगर परिषदेच्या वतीने शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शाळेतील असंख्य विद्यार्थिनी वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. हातात भगव्या पताका घेत ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत मृदुंगाच्या तालावर विद्यार्थिनींनी भजने म्हटली यावेळी शहरातील नागरिकांनी पालखीचे दर्शन घेत या सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक मोनिका झरेकर, शहर अभियंता गौरी चव्हाण, लिपिक प्रवीण माने, शिपाई अनिल इंगळे, बाळासाहेब पवळे, प्रवीण शिंदे, चंद्रशेखर खेते, रुपेश देशमुख आदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे नियोजन केले.

यावेळी मुख्याध्यापिका वैशाली राजेंद्र मिरगे, अनिता तिकोणे, संध्या कुलकर्णी, वर्षा थोरात, वसुंधरा माळवदकर, संजय चांदे, मयुरेश मुळे या शिक्षकांसह अनेक विद्यार्थिनी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

नगरपरिषद कार्यालयासमोरून या पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. फुलांनी सजवलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मारुती मंदिर चौक ते राजेंद्र चौक मार्गे बाजारपेठेतून गणपती चौक ते शाळा चौकातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीने पालखी सोहळ्याची सांगता झाली.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!