मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांना २०व २१ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर
लोनावळा : लोणावळात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच हवामान खात्याने जाहीर केलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व शाळांना दोन दिवसांची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे बुधवारी व गुरुवारी 20 व 21 ऑगस्ट २०२५रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सुट्टीदरम्यान शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांनी शाळेतील नोंदी, अभिलेख व शैक्षणिक साहित्य सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या दोन दिवसांत बुडालेला अभ्यासक्रम पुढील कार्यदिवशी पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत.नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी मंगळवारी दिनांक १९ऑगस्ट रोजी हा आदेश काढला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मागील दोन दिवसांपासून लोणावळा शहर व परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, नद्या-नाले व ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळे परिसरात संभाव्य धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















