Homeमहत्त्वाचेसोमाटणे फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात तळेगावातील युवकाचा मृत्यू

सोमाटणे फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात तळेगावातील युवकाचा मृत्यू

सोमाटणे : येथे काल बुधवार दिनांक २० ऑगस्ट२०२५रोजी रात्री १०.३० च्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या क्रशरच्या(MH11 AL 7335)या वाहनाने दिलेल्या धडकेत वैभव इंदरमल राठोड (वय २५) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, याप्रकरणी संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, वैभव राठोड हे रात्री आपल्या कामावरून घरी परतत असताना, सोमटणे फाटा परिसरात क्रशरसाठी साहित्य वाहून नेणाऱ्या अवजड वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि शवविच्छेदनासाठी तळेगाव रुग्णालयात हलवले.मावळ मधे अनेक क्रशर उद्योग कार्यरत असून, त्यांचे अवजड वाहने दिवस-रात्र रस्त्यांवरून बेदरकारपणे धावत असतात.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा याविरोधात आवाज उठवला असला तरी, अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. राजकीय पाठबळ आणि स्थानिक पाठींब्यामुळे हे वाहन चालक कोणतीही भीती न बाळगता वाहने चालवत असतात. परिणामी अशा घटना वारंवार घडत असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

वैभव राठोड यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकारच्या बेफिकीर वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!