आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते विविध बचत गटांना अन्नप्रक्रिया करिता बीज भांडवल वाटप
तळेगाव दाभाडे : शहरात नगरपरिषद कार्यालयात नगर परिषदेच्या विविध बचत गटांना अन्नप्रक्रिया करिता बीज भांडवल वाटप सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते विविध बचत गटांना अन्नप्रक्रिया करता बीज भांडवल वाटप करण्यात आले तसेच महाशक्ती शहर स्तर संघातर्फे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र व डेंगू सर्वेक्षण ड्रेस कोड वितरण नगर परिषदेच्या मार्फत वाटप करण्यात आले.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत अंबिका महिला बचत गट. पवित्रा महिला बचत गट. सक्षम महिला बचत गट. सिद्धिविनायक महिला बचत गट. श्री गणेश महिला बचत गट. सुखदा महिला बचत गट. श्री दत्त महिला बचत गट या व ०७ बचत गटांना बीज भांडवल रुपये २६५००००/ रकमेच्या चेक मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आला.
या भांडवलातून महिला बचत गट पापड लोणचे. मिरची मसाला .व इतर अन्नपदार्थ तयार करणार आहेत तसेच महाशक्ती संघामार्फत कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत जे प्रशिक्षण वर्ग संपन्न झाले. ज्यामध्ये बेसिक आरी वर्क. बेसिक ब्युटी पार्लर असे प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांनाही महाशक्ती संघाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक म्हणाले की बचत गटातील महिलांनी सुंदर व वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करावे. जास्तीत जास्त बचत गटांनी सदर योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विजयकुमार सरनाईक यांनी केले. आमदार सुनील शेळके यांनी आपल्या मनोगतात म्हटले की जास्तीत जास्त अन्नप्रक्रियेचे प्रस्ताव नगरपरिषदेकडे सादर करून महिलांनी या योजनेच्या लाभ घ्यावा याकरिता आवश्यक ती मदत नगरपरिषद व मी स्वतः देण्यास तयार आहे.
दिलीप ठोंबरे यांनी डेंगू सर्वेक्षणासाठी महिलांना मार्गदर्शन केले व ज्या महिलांमार्फत डेंगू सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्या महिलांना ड्रेस कोड वाटप करण्यात आले. नगरपरिषदेच्या शहर अभियान व्यवस्थापिका विभा वाणी व महाशक्ती संघाच्या कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
यावेळी आमदार सुनील शेळके, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे(पाटिल), माजी नगरसेवक अॅड नंदकुमार काळोखे, विस्तार अधिकारी पंचायत समिती वडगाव मावळचे दिलीप ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















