Homeमहत्त्वाचेमावळ इंडस्ट्री मिट २०२५ : औद्योगिक भविष्यासाठी ऐतिहासिक पाऊल

मावळ इंडस्ट्री मिट २०२५ : औद्योगिक भविष्यासाठी ऐतिहासिक पाऊल

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणारा “मावळ इंडस्ट्री मिट २०२५” हा भव्य कार्यक्रम नुकताच नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे उत्साहात पार पडला. माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या पुढाकाराने आयोजित या मिटमध्ये लघु, मध्यम व मोठ्या उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्योग-शेती समन्वय आणि तरुणांसाठी रोजगार निर्मितीवर भर

या परिषदेत औद्योगिक क्षेत्रासमोरील सध्याच्या आव्हानांवर चर्चा होऊन त्यावरील ठोस उपाययोजना मांडण्यात आल्या. पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, गुंतवणूक संधी, स्थानिक तरुणांसाठी रोजगार निर्मिती, उद्योग-शेती समन्वय, उत्पादनक्षमता वाढ, तसेच शाश्वत विकासासाठी हरित धोरण या महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारमंथन झाले.

सरकार-उद्योग सहकार्याची आवश्यकता अधोरेखित

सरकार आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहयोग अधिक बळकट करण्याची आवश्यकता सर्वांनी मान्य केली. यावेळी उपस्थित उद्योगपतींनी मावळच्या प्रगतीत सक्रिय सहभाग आणि योगदान देण्याचे आश्वासन दिले.

“ऐतिहासिक टप्पा” – संजय (बाळा) भेगडे

माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे म्हणाले, “मावळ इंडस्ट्री मिट २०२५ हा तालुक्याच्या औद्योगिक भविष्यासाठी ऐतिहासिक टप्पा ठरेल. या मिटमुळे उद्योग क्षेत्रातील संवाद आणि नेटवर्किंगला नवे व्यासपीठ मिळेल.”

या कार्यक्रमास औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर, उद्योगपती, तज्ञ, शैक्षणिक संस्था प्रतिनिधी आणि स्थानिक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सहभागामुळे मिटला सर्वंकष दिशा आणि व्यापक दृष्टीकोन प्राप्त झाला.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!