Homeमहत्त्वाचेजन आरोग्य योजना लाभार्थींनी मोफत आयुष्मान कार्ड काढून घ्यावीत

जन आरोग्य योजना लाभार्थींनी मोफत आयुष्मान कार्ड काढून घ्यावीत

राज्यातील जनतेसाठी सुरू असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी मोफत आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे येथील ढाकणे हॉस्पिटलच्या आरोग्य मित्र स्वाती शिंदे यांनी केले आहे.

स्वाती शिंदे म्हणाल्या की, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३४ विशेष श्रेणीत उपचार मिळतात. यामध्ये १०३८ उपचार पद्धती खाजगी व शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत, तर १७१ उपचार पद्धती फक्त शासकीय रुग्णालयांमध्ये दिल्या जातात. गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळवून देण्याचा या योजनेचा उद्देश असून, तळागाळातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचावी यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत.

तळेगावातील ढाकणे हॉस्पिटल, तळेगाव जनरल हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल, पायनर हॉस्पिटल आदी रुग्णालयांमध्ये आयुष्मान कार्ड मोफत काढून दिले जात आहे. हे कार्ड काढून घेतल्यास लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळतात.

कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

शिधापत्रिका (रेशन कार्ड)

इतर ओळखपत्र (पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)

संपर्क क्रमांक व पूर्ण पत्ता

अधिक माहितीसाठी नागरिकांनी आयुष्मान भारत हेल्पलाइन क्रमांक १४५५५ वर संपर्क साधावा किंवा ढाकणे हॉस्पिटलच्या आरोग्य मित्र स्वाती शिंदे (मो. ८०९७५४१९५१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(प्रतिनिधी: गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!