गणेशोत्सवानिमित्त वानप्रस्थाश्रमात बहारदार नाट्यसंगीत मैफिलीचे आयोजन
तळेगाव दाभाडे : येथील यशवंत नगर परिसरात असणाऱ्या वानप्रस्थाश्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदा उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांसाठी ठेवण्यात आली असून त्याचा शुभारंभ गुरुवार, दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
या दिवशी “रंगबहार” या बहारदार नाट्यसंगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिद्ध गायक ऋषिकेश बडवे, भक्ती पागे, केदार केळकर व संपदा थिटे नाट्यगीते सादर करणार आहेत. या कलाकारांना विशेष चिपळूणवरून येणारे सुप्रसिद्ध ऑर्गन वादक हर्षल काटदरे तसेच नामवंत तबलावादक केदार कुलकर्णी यांची साथ लाभणार आहे.
यासोबतच गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध दिवसांचे कार्यक्रम देखील आखण्यात आले आहेत –
बुधवार, ३ सप्टेंबर २०२५ – “स्वरगंध” या हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम.
गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५ – “रंगबहार” नाट्यसंगीत मैफल.
शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ – डॉ. भूषण फडके यांचे श्रवणीय “श्रीराम कथा”.
शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ – प्रकाश बोरगावकर यांचे सुश्राव्य व्याख्यान.
सदरील सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून दररोज सायंकाळी ६ वाजता सुरुवात होईल. त्यामुळे तळेगाव व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वानप्रस्थाश्रमाचे विश्वस्त पंडित सुरेश साखवळकर व उर्मिला छाजेड यांनी केले आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे मो. ९९२१८०७०११




















